Type Here to Get Search Results !

समावेशित शिक्षणावर आधारित व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यशाळा राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे संपन्न


 समावेशित शिक्षणावर आधारित व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यशाळा राजेंद्र विद्यालय खंडाळा खंडाळा येथे  संपन्न.

खंडाळा (प्रतिनिधी) – येथील राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे दिनांक २४ व २५ मार्च रोजी समावेशित शिक्षणावर आधारित व्यवस्थापन सक्षमीकरण या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृष्णा फडतरे (वरिष्ठ अधिव्याख्याता, डाएट फलटण) उपस्थित होते. तसेच गजानन आडे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खंडाळा), उर्मिला पवार (विस्तार अधिकारी), डेरे मॅडम (विशेष शिक्षक, वाई), आनंदराव शेडगे (जिल्हा समन्वयक, सातारा) यांच्यासह वनिता घाडगे मॅडम, सारिका पवार मॅडम, अनुश्री कुलकर्णी मॅडम व समुद्रे सर उपस्थित होते.या दोन दिवसीय कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी समावेश कसा करता येईल, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक कृष्णा फडतरे साहेब यांनी समावेशित शिक्षणाची गरज अधोरेखित करत शिक्षकांनी अध्यापनात सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच गजानन आडे साहेब यांनी खंडाळा तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत शिक्षणातील समता आणि संधी यावर भर दिला.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. तुळशीराम खांडे, उपप्राचार्य सौ. अरूंधती गाढवे, उपमुख्याध्यापिका सौ. मोहिते मॅडम,  सहकारी शिक्षका सौ. कांबळे मॅडम तसेच शिक्षक श्री.जयप्रकाश गेजगे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार समुद्रे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments