खंडाळ्यात जनगणना प्रगणक प्रशिक्षणाचा शुभारंभ आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर खंडाळा येथील राजेंद्र विद्यालयामध्ये प्रगणकाचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात सुरू झाले आहे. या महत्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ खंडाळ्याचे तहसीलदार सुहास थोरात यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आला.
देशाच्या नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्रियेसाठी प्रगणकाना सज्ज केले जात आहे. हे प्रशिक्षण 23 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. जनगणनेची माहिती अचूकपणे नोंदवणे आणि तांत्रिक बाबींचे मार्गदर्शक करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
या प्रशिक्षणा दरम्यान प्रगनकांना प्रत्यक्ष भेटी देऊन कशी माहिती गोळा करायची, अर्जातील तांत्रिक सज्ञा आणि डिजिटल माध्यमांचा वापर याबद्दल सविस्तर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणास मुख्य अधिकारी कल्याण हुलगे हे प्रमुख प्रशिक्षक तसेच सुनील बोडरे, जयप्रकाश गेजगे, सोमनाथ गर्जे, सुरज चव्हाण हे सहप्रशिक्षक म्हणून काम पाहणारआहेत. तर सहायक महसूल अधिकारी प्रफुल्ल बाबर हे प्रशासकीय काम पाहणार आहेत.
" जनगणना हे देशाच्या भविष्यातील धोरण निर्मितीचे मुख्य साधन आहे.त्यामुळे प्रत्येक प्रगणकाचे आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडावी आणि माहिती संकलित करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Post a Comment
0 Comments