Type Here to Get Search Results !

पंचक्रोशी विद्यालय पाडळी सुखेड बोरी येथे महिला दिन व विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे आयोजन....

 मंगळवार दिं 10 मार्च रोजी पंचक्रोशी विद्यालय पाडळी सुखेड बोरी येथे महिला दिन व NMMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी गौरव या कार्यक्रमाचे आयोजन ....... 


कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मां. सय्यद मॅडम आगार प्रमुख खंडाळा आगार, डॉ.माधुरी कुलकर्णी , व मा सौ.अरुंधती गाढवे मॅडम , संचालिका खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा , तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा डॉ.सौ शोभा चव्हाण ,संचालिका खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन  करून झाली.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक.श्री.डोईफोडे सर व ग्रामस्थांच्या हस्ते उपस्थित मान्यवरचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर आदर्श महिला संदेश सादरीकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.त्यानंतर माता पालक पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर NMMS परीक्षेत उत्तीर्ण 13 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..या प्रसंगी ज्येष्ठ पालक मा वामनराव शेडगे,पाडळी ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघमारे मॅडम, पोलिस पाटील सुखेड , मा.रमेश धायगुडे ,ज्येष्ठ संचालक पंडित सर ,शाळा समिती सदस्य मा.बावडेकर सर, मा. रासकर सर, मा.भानुदास गाढवे सर, माता पालक ,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयाचे शिक्षक सपकाळ सर,भुतांबरे सर,सौ.लोखंडे मॅडम,सौ. मोहिते मॅडम,श्रीमती गडदरे मॅडम, श्री. भडलकर सर, नवनीत शेडगे , उत्तम धायगुडे, माजी विद्यार्थी दीप्ती केसकर आणि जालिंदर माने यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments