Type Here to Get Search Results !

राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मार्गदर्शन कार्यक्रम



राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचे पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खांडके सर यांनी केले.कला शाखेचे महत्त्व श्री मनोज यादव यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.वाणिज्य शाखेतील विविध बँकिंग क्षेत्रातील संधींबाबत इंग्रजी विभाग प्रमुख श्री जयप्रकाश गेजगे यांनी मार्गदर्शन केले.शास्त्र शाखेबद्दलची माहिती शास्त्र विभाग प्रमुख श्री सचिन जाधव यांनी दिली.

कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य श्री तुळशीराम खांडे यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.उपप्राचार्य सौ अरूंधती गाढवे मॅडम व उपमुख्याध्यापिका सौ मोहिते मॅडम यांची उपस्थिती लाभली.विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गोरखनाथ भोसले यांनी केले.

Post a Comment

0 Comments